व्हिडीओ व्हायरल; सिद्धार्थ शुक्लाने दारुच्या नशेत केली डिलिव्हरी बॉयला मारहाण


बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा कार्यक्रम असून या शोमधील अनेक कलाकार आतापर्यंत चर्चेत राहिले आहेत. यातील एक नाव म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. ‘बिग बॉस १३’चा विजेता ठरलेला सिद्धार्थ कायम या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. सिद्धार्थचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो यात दारुच्या नशेत एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

सिद्धार्थने नुकताच त्याचा ४० वा वाढदिवस साजरा केला. पण याच काळात सोशल मीडियावर सिद्धार्थचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ‘द खबरी’ या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सिध्दार्थ दारुच्या नशेत एका डिलिव्हरी बॉयला मारहाण करताना या व्हिडीओत दिसत आहे. ही घटना अंधेरीतील ओशिवारा या भागात घडली असून त्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.


सिद्धार्थ बर्थ डे पार्टी संपल्यावर घरी जाण्यासाठी रवाना झाला. पण त्याच वेळी ओशिवारा या भागात त्याच्या कारला एका डिलिव्हरी बॉयच्या बाईकची धडक बसल्यानंतर डिलिव्हरी बॉय व सिद्धार्थ शुक्ला यांच्यात शाब्दिक वाद झाला. सिद्धार्थने या वादानंतर थेट त्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलत त्याला मारहाण केली.

दरम्यान, डिलिव्हरी बॉयने या अपघातानंतर सिद्धार्थला चाकू दाखवत मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर सिद्धार्थने डिलिव्हरी बॉयवर हात उचलल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.