जॉर्जिया बेटासमोर ठाकलेल्या हिमकड्यामुळे सागरी पर्यावरणाला धोका


लंडन: ऱ्होड आयलंडपेक्षाही मोठ्या आकाराचा हिमकडा दक्षिण अटलांटिक महासागरातील दक्षिण जॉर्जिया या ब्रिटिश बेटापासून अगदी जवळ आला आहे. त्यामुळे  जॉर्जिया बेटावरील पेंग्विन आणि सील यांच्यासह अनेक प्रकारच्या सागरी जीवांसाठी धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सागरी अंत:प्रवाह आणि वादळे यामुळे हिमकडा आणि बेट यांची टक्कर होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

अंटार्क्टिक हिमखंडापासून सन २०१७ मध्ये तुटून वेगळा झालेल्या या हिमकड्याला नॅशनल आईस सेंटरने ‘ए ६८ ए’ असे संबोधन दिले आहे. हा हिमकडा तब्बल ६५० फूट जाड असून त्याचा नऊ दशांश भाग पाण्याखाली आहे. तो ९३ मेल लांब आणि ३० मेल रुंद आहे. पाण्याच्या वर त्याच्या कडा दिसतात. सील, पेंग्विन आणि सागरी जीवांचा महत्वपूर्ण अधिवास असलेल्या जॉर्जिया या बेटापासून तो अवघ्या ३१ मेल अंतरावर आहे. जॉर्जिया बेट आणि हिमकडा यांचा आकार जवळजवळ सारखाच आहे.

हा हिमकडा नुसता जॉर्जिया बेटासमोर स्थिर उभा ठाकला तरी बेटावरील किंग पेंग्विन, मॅकरोनी पेंग्विन, सील मासे, पाणपक्षी यांना अन्न मिळविणे मुश्किल होणार आहे. त्यासाठी त्यांना या भव्य हिमकड्याला वळसा घालून त्याच्या पलीकडे जावे लागणार आहे. ब्ल्यू व्हेल माशांचे खाद्य असलेले छोटे क्रील मासे हे किनारपट्टीजवळच आढळतात. या हिमकड्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे व्हिल्सना कठीण होणार आहे.

लाँगला असा विचार आला होता की हिमशैल दक्षिण जॉर्जिया बेटच्या पूर्वेकडील बाजूला अडकण्याचा धोका असेल, परंतु तसे नाही ते म्हणाले, “मला वाटलं की ए aa ए दक्षिण जॉर्जिया आयलँडच्या दक्षिणेकडे जाईल आणि नंतर त्याच बेटाच्या पूर्वेकडील बाजूस परत अशाच मोठ्या आइसबर्गसारख्या परत जाईल.”

काळात या हिमकड्याचा प्रवास नक्की कसा असेल हे सांगता येणे अवघड आहे. मात्र, सागरातील अंत:प्रवाह आणि वादळे हिमकडा बेटावर धडकण्याची शक्यता निर्माण करू शकतात.

सध्याचा काळ हा बेटावरील सागरी जीवांसाठी संवेदनशील आहे. या काळात त्यांच्या प्रजननाचा हंगाम असतो. त्याचा काळात हिमकड्याच्या रूपाने हे संकटच उभे राहिले आहे, असे जॉर्जिया आणि सॅण्डविच बंदराच्या मत्स्यपालन आणि पर्यावरण विभागाचे संचालक मार्क बेल्चर यांनी सांगितले. पेंग्विनसाठी घरटी बांधली गेली आहेत आणि ते लवकरच अंडी घालतील. दोन आठवड्यापूर्वी सीलच्या पिल्लांचा जन्म होण्यास सुरुवात झाली आहे. ख्रिसमस हा सामान्यत: प्रजनन क्रियेचा सर्वात महत्वाचा काळ असतो, असे त्यांनी सांगितले.

ब्रिटीश ‘रॉयल एअर फोर्सची विमाने या कड्याच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ पथकासह जॉर्जियाकडे रावाना झाली आहेत. प्रत्यक्ष निरीक्षण, छायाचित्र आणि व्हिडीओज या द्वारे कड्याची सद्यस्थिती, हालचाली आणि स्थानिक परिस्थितीला त्याचा धोका याचा अभ्यास करण्यात येणार आहे, असे ‘ब्रिटिश फोर्सेस साऊथ ऍटलांटिक आयलँड्स’ने फेसबुकवर स्पष्ट केले आहे.