ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा: देवेंद्र फडणवीस


मुंबईः मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यात कोणतीही शंका नाही पण आम्ही कोणताही वाटेकरी ओबीसीच्या आरक्षणात स्वीकारणार नसल्याची ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. फडणवीस भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नसल्याचे कलम त्यात टाकले आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पण कोणतीही स्थगिती या कलमाला दिली नाही. आम्ही या कलमाद्वारे ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिवाय, ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

ओबीसी मंत्री बाहेर ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन करत आहेत. पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच, येत्या काळात ३४६ ओबीसी घटकांचा मेळावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.