सर्व अमेरिकन्सना मिळणार मोफत कोरोना लस: डोनाल्ड ट्रम्प


वॊशिंग्टन: विविध राज्यात कोरोनाची फायझर लस पाठविण्यास सुरुवात झाली असून अमेरिकेच्या सर्व नागरिकांना ही लास मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. येत्या चोवीस तासात प्रत्यक्ष लसीकरणाला प्रारंभ होणार आल्याचेही त्यांनी सांगितले.

फायझरच्या कोरोना लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटरवर लसीकरण प्रक्रियेची घोषणा करणारा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्याद्वारे त्यांनी लस सर्वांना मोफत वितरित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे

ऐरिकां प्रशासनाने यापूर्वीच वाहतुकीच्या वेगवेगळ्या सुविधांचा वापर करून सर्व राज्यांना लस पाठविण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण मोहिमेतील पहिली लस २४ तासांच्या आत दिली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.