
नवी दिल्ली : केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी एक मोठी घोषणा करत राज्यातील लोकांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाणार असून लसीच्या तातडीच्या वापरासाठी डीसीजीआयकडे अनेक लसीची निर्मिती करणाऱ्या उत्पादकांनी परवानगी मागितली असली तरी सरकारने अद्यापपर्यंत कोणत्याही लसीला परवानगी दिलेली नाही.
केरळमधील नागरिकांना मोफत दिली जाणार कोरोना प्रतिबंधक लस ; मुख्यमंत्री पी. विजयन यांची घोषणा
अमेरिकेच्या फार्म सेक्टर कंपनीतील दिग्गज फायझरसह सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कोरोना प्रतिबंधक लस ‘कोव्हिशिल्ड’ या देशात विकसित लसीच्या आपातकालीन वापरासाठी डीसीजीआयकडे मान्यता मागितली आहे.
या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री विजयन यांनी केले आहे. त्याचबरोबर काळजी घेतली नाही तर राज्याची अवस्था आणखी बिकट होईल.
शनिवारी केरळमध्ये कोरोना संक्रमित 5,949 नवीन रुग्णांची नोंद झाली तर 32 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात संक्रमणाची एकूण संख्या 6.64 लाखांवर गेली आहे तर मृत्यूची संख्या 2,594 वर पोहचली आहे. आज 5,268 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, ज्यामुळे राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 6,01,861 पर्यंत वाढली आहे, तर सध्या 60,029 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात एकूण कोरोना केसेस वाढून 6,64,632 वर गेली आहेत.
