संसदेवरील हल्ला विसरू शकत नाही: मोदी


नवी दिल्ली: संसदेवर १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना पन्तप्तधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संसदेवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचे देशाला विस्मरण होऊ शकत नाही. या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या शौर्य आणि त्याग भारतीयांच्या स्मरणात राहील. देश त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहील, अशा शब्दात मोदी यांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. हुतात्म्यांच्या शौर्य आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्विट मोदी यांनी केले आहे.

या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता.