वॉशिंग्टन – अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप-राष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना टाईम मॅगझीनने वर्ष २०२० साठी ‘पर्सन ऑफ द इयर’ घोषित केले आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच बहुप्रतिक्षित अशा राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुका पार पडल्या. जो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा निवडणुकांच्या निकालानंतर विजय झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
जो बायडेन आणि कमला हॅरिस ठरल्या टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’
यासंदर्भात एएफपी या वृत्तसंस्थाने दिलेल्या अहवालानुसार टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’ म्हणून डेमोक्रेटिक पक्षाचे जो बायडेन आणि कमला हॅरिस यांना निवडल्याची माहिती दिली. ट्रम्प यांचा मोठ्या फरकाने जो बायडेन यांनी पराभव केला. तर दुसरीकडे उप-राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे कमला हॅरिस यांच्या हातीदेखील सोपवण्यात आली. पर्सन ऑफ द ईयरने गेल्या वर्षी पर्यावरणाच्या चळवळीत सहभागी असलेल्या ग्रेटा थनबर्गला सन्मानित करण्यात आले होते. तर हा सन्मान २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला होता. बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या फोटोंचा एक कव्हर फोटो टाईम मॅगझीनने तयार केला असून त्यांनी मॅगझीनच्या फोटोंसोबतच ‘चेंजिंग अमेरिका स्टोरी’ हे टायटल दिले आहे. त्याचबरोबर अमेरिकेची इतिहास बदलण्यासाठी, मतभेदाऐवजी सहानुभूतीला अधिक ताकद असल्याचे सिद्ध करण्यासाठी आणि कठिण काळातून पुढे जात असलेल्या जगाला एक दृष्टी देण्यासाठी, असे कॅप्शन टाईम मॅगझीनने दिले आहे.