प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका


मुंबई – बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा याला हृदयविकाराचा झटका आला असून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. काही ब्लॉकेज रेमोच्या हृदयात होते. डॉक्टरांनी त्याची अँजिओग्राफी केली असून सध्या तो आयसीयूमध्ये आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. पुढील २४ तास खूप महत्त्वाचे असल्याची, अशी माहिती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने दिली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

रेमोने प्रसिद्ध गाण्यांच्या कोरिओग्राफीशिवाय ‘एबीसीडी’, ‘एबीसीडी २’ आणि ‘स्ट्रीट डान्सर थ्रीडी’, रेस 3 सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याचबरोबर ‘डान्स इंडिया डान्स’, ‘डान्स प्लस’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोमध्ये त्याने परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.