करोना बचावासाठी चीनने भरपूर खाल्ला भारतीय गुळ?

करोना साथीमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी भारतात अनेक प्रकारचे काढे घेण्याचे सल्ले दिले जात होते त्याकाळात ज्या देशाने करोनाची भेट जगाला दिली तो चीन मात्र भारतातून आयात केलेल्या गुळावर अवलंबून राहिला होता असे निर्यातीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. करोना प्रतिबंधाचा सर्वोत्तम मार्ग रोगप्रतिकार शक्ती वाढविणे हाच आहे आणि गुळातील या गुणधर्माचा फायदा चीनने घेतला असे म्हणता येईल.

गुळ हा रक्ताची कमतरता दूर करणारा, रोगप्रतिकार शक्ती वाढविणारा, शरीराला उर्जा देणारा, संक्रामक रोगांपासून संरक्षण देणारा, फ्ल्यू सारख्या संक्रमणाचा इलाज, बद्धकोष्ठ्ता दूर करणारा, लिव्हर मधील विषारी द्रव्ये बाहेर काढणारा, रक्त स्वच्छ करणारा आणि श्वसन समस्या दूर करणारा म्हणून आयुर्वेदात सांगितला गेला आहे. गुळात अनेक प्रकारची जीवनसत्वे, क्षार, आहेत पण त्यात फॅट नाही. गुळ हा उर्जेचा चांगला स्त्रोत आहे.

चीनने गेल्या वर्षात भारतातून २४०४ मेट्रिक टन गुळ आयात केल्याचे निर्यात आकडेवारी सांगते. त्याच्या अगोदरच्या वर्षात हे प्रमाण ६३ मेट्रिक टन होते. चीनने गुजराथ मधून १५८३, महाराष्ट्रातून ८१९.४६, तेलंगाना मधून २ मेट्रिक टन गुळ आयात केला असून या गुळाची किंमत ९.२२ लाख डॉलर्स होती असे समजते. गुळाबरोबर गुळाचे अन्य पदार्थ सुद्धा चीनने या वर्षात आयात केले आहेत.