बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओन लवकरच ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सनी लिओन या चित्रपटात मराठमोळ्या अवतारात दिसत आहे. आपल्या इन्स्टाग्राम पेजवर सनीने याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आतापर्यंत ज्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत. या व्हिडिओतील सनीच्या अदा आणि डान्स याची जोरदार चर्चा तर होत होतीच, पण सनीचे कौतुकही होते आहे. सनीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना ‘हो आली रे आली…मराठी मुलगी आली’ अशी कॅप्शनही दिली आहे.
तुम्ही पाहिला का सनी लिओनचा मराठमोळा अंदाज, व्हिडिओ व्हायरल
सनीने शेअर केलेल्या ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव’ चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ आवडल्याचे अनेकांनी म्हटले आहे. सनीवर चित्रीत झालेले गाणे प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे. या चित्रपटात सनीसोबत अर्जुन रामपाल, दिगंगना सूर्यवंशी आणि कृष्णा अभिषेक हेसुद्धा दिसणार आहेत. दरम्यान, सनी लियोन ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगांव’ चित्रपटासोबतच आगामी हॉरर कॉमेडी ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ आदींमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.