Video: अवघ्या 10 सेकंदात पाडली 144 मजली बिल्डिंग


दुबई – जर का एखादी 100 मजल्यांची बिल्डिंग बांधायची म्हटल्यास त्याला अनेक वर्षे लागतील. तिच बिल्डिंग जमीनदोस्त करायची असेल तर त्यासाठी काही सेकंदाचा कालावधी पुरेस होईल. याचदरम्यान नुकतीच युएईच्या अबूधाबीमध्ये तब्बल 144 मजली बिल्डिंग अवघ्या 10 सेकंदात जमीनदोस्त करण्यात आली. आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बिल्डिंगचे नाव नमूद करण्यात आले आहे. कारण एवढी टोलेगंज बिल्डिंग यापेक्षा कमी वेळेत यापूर्वी कधीही पाडण्यात आलेली नाही.

8 डिसेंबर रोजी हा व्हिडिओ ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’च्या फेसबुक पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. ही बिल्डिंग 26 नोव्हेंबर रोजी पाडण्यात आली. डायनामाइट स्फोट करुन अबूधाबीच्या मीना प्लाझामधील ही बिल्डिंग पाडली. 165.032 मी. (541.44 फूट) एवढी या 144 मजली बिल्डिंगची उंची होती. बिल्डिंग जमीनदोस्त करतेवेळी जवळच्या परिसरातील बाजारपेठ आणि दुकाने बद करण्यात आली होती.