गुगलवर सर्वाधिक सर्च झाली कनिका कपूर

फोटो साभार द वीक

गुगलने २०२० मध्ये ८ डिसेंबर पर्यंत सर्वाधिक सर्च रिझल्ट डेटा शेअर केला असून त्यात बॉलीवूड मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलेब्रिटी ठरली आहे गायिका कनिका कपूर. विशेष म्हणजे कनिका सर्वप्रथम करोना संसर्ग झालेली सेलेब्रिटी सुद्धा ठरली आहे.

करोना विषाणूमुळे या वर्षात जगाची गतीच थांबल्याचा अनुभव सर्वाना येत आहे. मायानगरी मुंबईतील बॉलीवूड साठी सुद्धा हे वर्ष अतिशय वाईट गेले आहे. करोना मुळे चित्रपट शुटींग, रिलीज होऊ शकले नाहीत तसेच अनेक नामवंत कलाकार या वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. ऋषी कपूर, इरफान खान, सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूने रसिकांना चटका बसला. अनेक कलाकारांना करोना संसर्ग झाला.

गुगलच्या अहवालानुसार सर्वाधिक सर्च झालेली व्यक्ती ठरली अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन. बॉलीवूडचा विचार करायचा तर कनिका बरोबर अमिताभ बच्चन, कंगना रानौत, सुशांतसिंग, रिया चक्रवर्ती यांच्यावरही मोठा सर्च केला गेला आहे. कनिका करोना संसर्गामुळे चांगलीच चर्चेत आली आणि त्याबद्दल तिला टीकेला सामोरे जाण्याचीही पाळी आली. करोना टेस्ट पोझिटिव्ह येऊनही कनिका अनेक पार्ट्या, कार्यक्रमात सहभागी झाली होती आणि शेवटी तिला घरातून जबरदस्तीने हॉस्पिटल मध्ये नेऊन क्वारंटाईन करावे लागले होते. तीन मुलांची आई असलेली कनिका बेबी डॉल, चिटीया कलाईवे या गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

मनोरंज क्षेत्रात सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा सर्चिंग मध्ये टॉप ट्रेडिंग चित्रपट ठरला.