नुकताच ‘पौरषपूर’ या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. पुरुषी मक्तेदारीविरोधात, महिलांना मिळणारी असमान वागणूक यावर आधारित पौरषपूर ही वेबसीरीज आहे. 7-8 या सीरिजचे भाग असणार आहेत. येत्या 29 डिसेंबरला ही वेबसीरीज ऑल्ट बालाजी आणि जी5 रिलीज होणार आहे. पण ही वेबसीरीज रिलीज होण्याआधीच चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र पौरषपूर या वेबसीरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या बोल्ड सिनची रंगली आहे. या वेबसीरीजमध्ये अभिनेता मिलिंद सोमण याचा अनोखा लूक पाहायला मिळत आहे.
ट्रेलर; मिलिंद सोमणाची ‘पौरषपूर’ वेबसीरीज बोल्ड सिनमुळे चर्चेत
मिलिंद सोमण, अन्नू कपूर, शिल्पा शिंदे, शाहीर शेख, पौलमी दास, साहिल सलाथिया आणि फ्लोरा सैनी या वेबसीरीज एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पौरषपूरसारख्या वेब सीरीजमध्ये काम करत असताना भारी वाटत आहे. आशा आहे की, शूटच्या वेळी आम्ही जितका आनंद घेतला तितका तुम्हीपण पाहताना घ्याल, असे शिप्ला शिंदे म्हणाली आहे.
मिलिंद सोमणच्या या वेबसिरीजमधील लूकला अधिक पसंती दिर्शवली जात आहे. या वेबसीरीजमध्ये बोरीस नावाचे पात्र मिलिंद सोमणने साकारले आहे. बोरीस हे पात्र तृतीयपंथी असल्याचे दाखवण्यात आले आहे. मिलिंद सोमणने ‘पौरषपूर’ या वेबसीरिजसाठी नाकात नथ, धोतर, कपाळाला कुंकू, लांब केस, हातात तलावर अशा किलिंग लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.