जालना – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राच्या धर्तीवर राज्यातही लसीकरणाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आहे, आता फक्त केंद्राच्या परवानगीकडे लक्ष असल्याचे राजेश टोपे यांनी जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. मुंबईतील केईएम रुग्णालयात राज्यातील लसीकरणाचा पहिला प्रयोग केला जाणार आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयात केला जाणार लसीकरणाचा पहिला प्रयोग
संपूर्ण राज्यभरात कोरोना प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी सर्व कामे पूर्ण झाली अशून आता आम्ही केंद्र सरकार आणि औषध महानियंत्रक यांच्या परवानगीची वाट पाहत असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
त्याचबरोबर पुढे ते म्हणाले की, वाहतूक आणि कोल्ड चेनची व्यवस्था प्रत्येक राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. अत्यंत जलद गतीने महाराष्ट्रात ते काम सुरु आहे. महाराष्ट्रात कोल्ड चेन, प्रशिक्षण आणि वाहतुकीबद्दल जे टार्गेट अदर पूनावाला यांनीदेखील दिले होते ते आम्ही पूर्ण केल्याचे सांगितले आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.