भारत बंद विरोधात कंगना राणावतचे ट्विट


गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात ट्विट केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत आहे. तिच्यात आणि अभिनेता दिलजीत दोसांजमध्ये याचवरुन ट्विट वॉर झाले होते. त्यातच आता शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ विरोधात कंगनाने ट्विट केले आहे. कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कंगना ‘भारत बंद’च्या विरोधात असून एका वेगळ्या अंदाजात तिने भारत बंदचा विरोध केला आहे. सद्गुरूंचा व्हिडीओ कंगना ट्विट केला आहे. ज्यामध्ये आंदोलनाबाबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.


कंगनाने व्हिडीओ शेअर करताना लिहिले आहे की, आओ भारत को बंद कर देते हैं, यूँ तो तूफानों कि कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहाँ, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकडा अब तुम भी माँग लो, आजाओ सडक पे और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं. सोशल मीडिया युजर्सच्या कंगनाने या ट्विटला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. तर अनेक युजर्स कंगनाच्या या ट्विटवर टीकाही करत आहेत. तसेच अनेकांनी कंगनाने घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे म्हणत आहेत.