बिजिंग – भारताने चीन अॅप्सवर डिजीटल स्ट्राईक केल्यानंतर आता चीननेही भारताच्या पावलावर पाऊल ठेवत डिजीटल स्ट्राइक केला आहे. यासंदर्भातील वृत्त रॉयटर्स प्रसिद्ध केले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 105 अॅपवर बंदी घालण्याचा आदेश चीन सरकारने जारी केला असून यात अमेरिकेसह जगातील अनेक मोठ्या देशांतील प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. त्याचबरोबर हे अॅप्स तात्काळ अॅप स्टोअरवरूनही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आता चीनची अमेरिकेसह अनेक मोठ्या देशांच्या 105 अॅपवर बंदी
भारताने याच वर्षी चीनवर तीन वेळा डिजिटल स्ट्राईक केला होता. केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्या डिजिटल स्ट्राइकमध्ये चीनच्या 43 मोबाईल अॅप्लिकेशन्सवर पूर्णपणे बंदी घातली. आतापर्यंत चीनच्या जवळपास 220 मोबाईल अॅप्सवर भारताने बंदी घातली आहे. यात टीक-टॉक, पबजी, हॅलो आणि यूसी ब्राउझर सारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे.
अमेरिकेची ट्रॅव्हल कंपनी ट्रिपअॅडव्हायझरसह 105 अॅप्स चीनने अॅप स्टोर्सवरून हटवले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार ही बंदी एका अभियानांतर्गत घालण्यात आली आहे. अश्लील साहित्य, वेश्यावृत्ती, जुगार आणि हिंसक गोष्टी पसरविण्याचा या अॅप्सवर आरोप आहे. मंगळवारी चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कसल्याही प्रकारची माहिती न देता एकापेक्षा अधिक वेळा सायबर कायद्याचे या अॅप्सनी उलंघन केले आहे.