पुण्यात १७ स्वयंसेवकांना स्पुतनिक पाच करोना लसीचा डोस

फोटो साभार फर्स्ट पोस्ट

महाराष्ट्रात पुण्यात रशियाच्या स्पुतनिक पाच करोना लसीच्या मानवी चाचणी कार्यक्रमात १७ स्वयंसेवकांना लसीचा डोस दिल्याची माहिती रविवारी देण्यात आली. गामलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिऑलॉजी व रशियाच्या डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड यांनी मिळून ही लस विकसित केली असून भारताने या लसीचे १० कोटी डोस बुक केले आहेत.

नोबेल हॉस्पिटल क्लिनिकल रिसर्च डिपार्टमेन्ट प्रमुख डॉ. एस. के. राउत यांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी चाचण्या तीन दिवसापूर्वी म्हणजे गुरुवार पासून सुरु केल्या गेल्या असून १७ स्वयंसेवकांना लस दिली गेली आहे. हे सर्व स्वयंसेवक काही दिवस डॉक्टरांच्या देखभाली असतील. सरकारच्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार स्वयंसेवकांची निवड केली गेल्याचे त्यांनी सांगितले.