हे अ‍ॅप वगळता UPI पेमेंटवर 1 जानेवारीपासून शुल्क आकारणी


मुंबई – नोटाबंदीनंतर सुरु झालेले व आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर १ जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.

हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआई) घेतला आहे. NPCI ने याचबरोबर थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. पण पेटीएमच्या ग्राहकांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावला जाणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही. पण, हे शुल्क फोनपे (Phonepe), गूगलपे (Google Pay), अॅमेझॉन पे (Amazon Pay) या पेमेंट अॅपवरून पैसे ट्रान्सफर केल्यास आकारले जाणार आहे.

एनपीसीआयने या निर्णयाबाबत सांगितले की, ३० टक्के कॅप थर्ड पार्टी अ‍ॅप प्रोव्हायडर्सवर लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी एनपीसीआयने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता कुठल्याही पेंमेंट अ‍ॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अ‍ॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.