शेतकरी आंदोलनावर अक्षय कुमार मुग गिळून गप्प का? नेटकऱ्यांचा सवाल


नवी दिल्ली – कलाविश्वातून अनेक प्रतिक्रिया दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर येऊ लागल्या असून या शेतकऱ्यांना अनेक कलाकारांना पाठिंबा दिला आहे. पण अभिनेता अक्षय कुमार या सगळ्यात सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. अद्यापही या आंदोलनावर अक्षयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून त्याने याच काळात एक जाहिरात शेअर केली आहे. ज्यामुळे तो ट्रोल होत आहे.


अक्षयने सोशल मीडियावर अलिकडेच ‘पगार बुक’ची एक जाहिरात शेअर केली. मासिक वेतन, अडेंटेन्स आणि अॅडव्हान्स पेमेंट यासारख्या आवश्यक गोष्टींचा डिजिटल व्यवहार कसा करावा, हे या जाहिरातीत सांगताना दिसत आहे. यात अब इंडिया का हर बिजनेसमॅन होगा डिजिटल, असे सांगताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्याची ही जाहिरात पाहिल्यावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्या हक्कासाठी शेतकरी लढा देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना पाठिंबा देण्याऐवजी तू जाहिराती कसल्या करतो, असा प्रश्न त्याला नेटकऱ्यांनी विचारला आहे.