भाजपच्या पराभवावर अमृता फडणवीसांचे ट्विट


मुंबई: महाविकास आघाडीकडून राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे दुखावले गेलेले भाजप नेते आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान यात आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत उडी घेतली आहे.


महाविकास आघाडीने राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुक निकालांमध्ये जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का दिला आणि घवघवीत यश मिळवले आहे. तर दुसरीकडे भाजपला पुणे, नागपूर या बालेकिल्ल्यांसह औरंगाबादमध्येही दारुण पराभवाचा सामना करावा लागला. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या धक्कादायक निकालानंतर भाजपला लक्ष्य केले जात आहे. याचदरम्यान अमृता फडणवीसांनी ‘वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो, अशा आशयाचे ट्विट केले आहे.