पृथ्वीवर कुणीच पाहिला नसेल अश्या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी

फोटो साभार भास्कर

या वर्षात करोनाच्या हाहाकारामुळे संपूर्ण जगालाच हे वर्ष कधी संपेल असे झाले आहे. मात्र सरत्या वर्षात २१ डिसेंबरची रात्र आपल्यासाठी एक दुर्मिळ योग घेऊन येत आहे. गेल्या चारशे वर्षात न दिसलेली एक आकाशीय घटना या रात्री घडणार आहे. २१ डिसेंबर ला रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळात पश्चिमेला आकाशात तेजस्वी आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत. हे दृश्य नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे.

पृथ्वीवर आज घडीला जिवंत असलेल्या कुणीही हे दृश्य पाहिलेले नाही आणि या नंतर त्यासाठी २०८० सालची प्रतीक्षा करावी लागेल. अर्थात गुरु आणि शनी हे ग्रह जवळ येण्याची घटना दर २० वर्षांनी घडते पण यावेळी ते जितके एकमेकांच्या जवळ आहेत ते यापूर्वी ४०० वर्षांपूर्वी घडले होते. या युतीला ग्रेट कंजेशन असे म्हटले जाते. आपल्या ग्रहमालिकेत गुरु पाचवा तर शनी सहावा ग्रह आहे पण दोघांच्या सूर्यप्रदक्षिणेला लागणारा काळ वेगवेगळा आहे. या पूर्वी असा योग १६ जुलै १६२३ रोजी आला होता आणि त्यावेळी दुर्बिणीचा शोध लावणारा गॅलिलिओ जिवंत होता पण दुर्बिणीचा शोध त्यावेळी लागलेला नव्हता.

ज्यांची नजर तेज आहे अश्या लोकांना २१ डिसेंबर रोजी शनीचा चंद्र टायटन हाही दिसू शकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही.