त्या वृद्ध शेतकरी महिलेवरुन दिलजीत-कंगनामध्ये जुंपली


देशासह महाराष्ट्रातील अनेक मुद्यांवर अभिनेत्री कंगना राणावत बेधडक आपले मत व्यक्त करत असते. त्यातच तिच्या वक्तव्यामुळे अनेकदा टीका देखील होते. पण या टीकेमुळे तिचादेखील तीळपापड होतो, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यातच आता तिचा दिलजीत दोसांजसोबत पंगा झाला असून दिलजीतवर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या असून तिने दिलजीतचा उल्लेख करण जोहरचा ‘पालतू’ असा केला आहे.

कंगना राणावतची सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर टिवटिव सुरु आहे. तिने अलीकडेच या आंदोलनात सहभागी एका वृद्ध महिलेची खिल्ली उडवणारे ट्विट केले होते. तिला यावरून जबरदस्त ट्रोल करण्यात आले. कंगनाच्या याच ट्विटवर दिलजीत दोसांजने सणसणीत प्रतिक्रिया दिली. कंगना, पुराव्यासोबत हे ऐक. बंदा इतना भी अंधा नहीं होना चाहिए,’ अशा शब्दांत एक व्हिडीओ शेअर करत दिलजीतने कंगनाला फटकारले. मग काय कंगनाच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली. दिलजीतला तिने असा काही रिप्लाय दिला की, तिचे ट्विट वाचून सगळेच हैराण झाले आहेत.


ओ,करण जोहर के पालतू, जो दादी शाहीन बाग में अपनी नागरिकता के लिए लिए प्रदर्शन कर रही थी, वही बिलकिस बानो दादी जी किसानों के एमएसपी के लिए भी प्रदर्शन करती हुई दिखी। महिंदर कौर जी को तो मैं जानती भी नहीं। क्या ड्रामा चलाया है तुम लोगों ने? इसे तुरंत खत्म करो ‘, असे ट्विट कंगनाने केले.

त्याचबरोबर दुसऱ्या एका ट्विटमध्ये केले. सुनो गिद्दों मेरी खामोशी को मेरी कमजोरी मत समझना, मैं सब देख रही हूँ किस किस तरह से तुम झूठ बोलकर मासूमों को भड़का रहे हो और उनको इस्तेमाल कर रहे हो, जब शाहीन बाग की तरह इन धरनों का रहस्य खुलेगा तो मैं एक शानदार स्पीच लिखूँगी और तुम लोगों का मुँह कला करूँगी- बब्बरशेरनी’, असे तिने लिहिले.