पंजाब मुख्यमंत्री अमरिंदरसिंग घेणार पाहिला करोना लस डोस

फोटो साभार रिपब्लिक वर्ल्ड

आयसीएमआर कडून करोना लसीकरण करण्यास मंजुरी मिळाल्यावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग राज्यात सर्वप्रथम करोना लसीचा पाहिला डोस टोचून घेणार आहेत. पंजाब मध्ये पहिल्या टप्प्यात ही लस तीन कोटी लोकसंख्येपैकी २३ टक्के म्हणजे ७० लाख नागरिकांना दिली जाणार आहे. त्यात प्राधान्याने १.२५ लाख आरोग्य कर्मचारी, करोना काळात आघाडीवर कार्यरत असलेले अन्य सेवक, ५० वर्षाच्या पुढील नागरिक आणि गंभीर आजार असलेले नागरिक यांचा समावेश असेल असे समजते.

बुधवारी या संदर्भातील घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर करण्यात आली असून मंत्रिमंडळाची ही बैठक लसीकरणाच्या तयारी संदर्भात होती. आरोग्य सचिव हुसनलाल म्हणाले लसीकरण करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. लस मंजुरी मिळताच प्रथम या कर्मचाऱ्याचे लसीकरण केले जाणार आहे.