खासदार अभिनेता सनी देओलला  करोना

फोटो साभार हिंदुस्तान टाईम्स

बॉलीवूड अभिनेता आणि आता पंजाब गुरुदासपूरचा खासदार सनी देओल याला करोनाची बाधा झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचीव अमिताभ अवस्थी यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस सनी हिमाचल मधील मनाली जवळ एका फार्म हाउस वर विश्रांतीसाठी गेला होता. तेथून मुंबईला परतण्यापूर्वी त्याची करोना चाचणी केली गेली ती पोझिटिव्ह आली आहे.

६४ वर्षीय सनीच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याच्या खांद्यावर मुंबईत शस्त्रक्रिया केली गेली होती. त्यानंतर विश्रांती घेण्यासाठी सनी मित्रासमवेत मनाली येथे गेला होता. पण आता त्याची करोना चाचणी पोझिटिव्ह आल्याने त्याला आयसोलेशन मध्ये ठेवले गेले आहे. त्याची तब्येत चांगली आहे असे समजते. सनी सुट्टीसाठी अनेकदा मनाली येथे जातो, मनाली त्याचे आवडते पर्यटनस्थळ असून सोशल मीडियावर तो हिमाचल भेटीचे फोटो नेहमी शेअर करत असतो.