राज्यातील फ्रंटलाईन वर्कर्संना दिली जाणार सर्वात आधी कोरोना प्रतिबंधक लस


मुंबई – संपूर्ण जगातील विविध कंपन्या सध्याच्या घडी कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यातच संपूर्ण जगाचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार याकडे लागून राहिलेले असतानाच दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस सर्वात आधी आपल्याला मिळावी यासाठी लॉबिंग सुरू असून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हे लॉबिंग करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कुणी कितीही लॉबिंग तरीही सर्वात आधी लस डॉक्टर आणि पोलिसांना देणार असल्याचे सांगितले आहे. ज्यांना महाराष्ट्रात सर्वात आधी लस द्यायची आहे त्यांची यादी करण्याचे काम सुरू असून राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी या यादीत नाव यावे म्हणून फिल्डिंग लावत असल्याचा आरोप होतो आहे. राजेश टोपे यांनी या सगळ्यावर भाष्य करत सर्वात आधी डॉक्टर आणि पोलिसांना लस देणार असे त्यांनी म्हटले आहे.