जाणून घ्या घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर


नवी दिल्ली – दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरचे दर निश्चित करतात. देशातील प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्यामुळे त्यानुसार गॅस सिलिंडरच्या किंमतीत फरक असतो. गॅस कंपन्यांनी नेहमी प्रमाणे आजही दराचा आढावा घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता. तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार 14.2 किलोचा सबसिडी नसलेला गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये 594 रुपये आहे. कोलकातामध्ये 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईत 610 रुपये आहे. बेकरी हॉटेलसारख्या आस्थापनांमध्ये वापरण्याच येणारा कमर्शिअल गॅस सिलिंडरचा दर वाढविण्यात आला आहे. 1410 रुपये चेन्नईत हा दर वाढून झाला आहे. दिल्लीमध्ये 55 रुपयांनी वाढून 1296 रुपये, कोलकातामध्ये 55 रुपयांनी वाढून 1351रुपये आणि मुंबईत देखील 55 रुपयांनी वाढून 1244 रुपये झाला आहे.

केंद्र सरकार सध्या एका कुटुंबाला वर्षाला 12 सिलिंडर सबसिडीवर देते. त्यापेक्षा जास्त सिलिंडर हवा असल्यास तो बाजारभावाने विकत घ्यावा लागतो. दर महिन्याला ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारानुसार ठरविली जाते.