
अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार करुन त्यांची हत्या केली. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल करण्यात आले, पण त्यांचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
अहमदनगरमध्ये यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या
सोमवारी (30 नोव्हेंबर) आपला मुलगा आणि आईसोबत रेखा जरे या पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. रेखा जरे यांच्यावर हल्लेखारांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केले. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात त्यांना त्वरीत दाखल करण्यात आले, पण गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा जरे या कार्यकर्त्या होत्या. पण त्यांनी नंतर महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. पण त्यांच्या हत्येने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली आहे.
