पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी देशातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारने कोरोनासंबंधी चर्चा करण्यासाठी बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. कोरोना महामारीचा फटका भारतातील ९४ लाखांहून अधिक लोकांना बसला आहे. यासंदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी या बैठकीला उपस्थित असतील. बैठकीसंबंधी सभागृह नेत्यांशी संसदीय कार्यमंत्रालयाने संपर्क साधला आहे. भारत कोरोनाबाधितांच्या आकडेवारीच्या बाबतीत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ३० जानेवारीला कोरोनाची पहिली केस समोर आल्यानंतर आतापर्यंत ८८ लाख कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून १ लाख ३० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.