वाजिद खानच्या पत्नीचा कुटुंबियांवर आरोप, धर्म बदलण्यासाठी दिला त्रास!


याचवर्षी संगीतकार जोडी साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान याचे निधन झाले. या वेदनेतून त्यांची पत्नी कमालरूख खान अद्याप बाहेर येऊ शकली नाही. त्यांनी यादरम्यान सोशल मीडिया अकाउंटवर एक इमोशनल पोस्ट लिहिली. यात त्यांनी पतीच्या कुटुंबियांनी धर्म बदलण्यासाठी कशाप्रकारे धमकावले किंवा भिती दाखवली हे सांगितले आहे. कमालरूख ही जन्माने पारसी आहे.

इन्स्टाग्राम हॅंडलवर एक अ‍ॅंटी कन्वर्जन लॉवर पोस्ट वाजिद खानच्या पत्नीने लिहिली आहे. तिला इंटरकास्ट मॅरेजमुळे काय वेदना, त्रास सहन करावा लागला याचा उल्लेख तिने यात केला आहे. आपल्या पोस्टमध्ये कमालरूखने लिहिले आहे की, ती आणि वाजिद कॉलेजमध्ये एकत्र होते. दोघे १० वर्षे लग्नाआधी सोबत होते. कमालरूख पारसी तर वाजिद मुस्लिम होता. त्यांनी स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार लग्न केल होते.


कमालरूखने लिहिले की, एका साधारण पारसी डेमोक्रॅटीक सिस्टीममध्ये माझी वाढ झाला. विचारांचे स्वातंत्र आणि हेल्दी डिबेट होत होते. शिक्षणाला प्रोत्साहन दिले जायचे. पण लग्नानंतर हेच स्वातंत्र, शिक्षण आणि डेमोक्रॅटीक मूल्य माझ्या पतीच्या परिवारासाठी सर्वात मोठी समस्या बनले. तिने पोस्टमध्ये लिहिले की, तिच्या पतीच्या परिवाराला स्वतंत्र महिला आणि विचार स्वीकार नव्हते. त्यांनी चुकीच्या पद्धतीने तिच्या धर्म न बदलण्याच्या निर्णयालाही बघितले. कमालरूखने सांगितले की, प्रत्येक धर्माचा ती सन्मान करते आणि प्रत्येक उत्सवात सहभागी होते. पण धर्म न बदलण्याच्या निर्णयाने तिच्यातील आणि वाजिदमधील अंतर वाढले होते. त्यांच्या पती-पत्नीच्या नात्यावर आणि मुलांवरही याचा परिणाम झाला.

कमालरूखने पुढे लिहिले की, याची परवानगी माझा आत्मसन्मान देत नव्हता की, मी इस्लाम आपल्या पती आणि त्याच्या परिवारासाठी कुबूल करण्यासाठी वाकावे. माझा व्यक्तिगत कन्वर्जनवर विश्वास नाही. तिने सांगितले की, अनेक वर्ष या भयानक विचाराचा मुकाबला करण्याचा मी प्रयत्न करत राहिले. याचा परिणाम असा झाला की, मला त्याच्या परिवाराने वेगळे पाडले आणि कन्वर्जनसाठी धमकावले, घाबरवले. ज्यात घटस्फोटासाठी न्यायालयात घेऊन जाण्याचाही समावेश होता. तसेच वाजिद फारच टॅलेंटेड म्युझिशिअन आणि कंपोजर होता. त्याची मला आणि माझ्या मुलांना फार आठवण येते. त्याने आणखी काही वेळ आमच्या सोबत रहायला हवे होते. तिने लिहिले की, पतीच्या निधनानंतर त्याचा परिवार अद्यापही त्रास देत आहे.