महाराष्ट्रातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींनी केले कौतुक


नवी दिल्ली : कृषी विधेयकाविरोधात राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून पंतप्रधानांचा हा कार्यक्रम कृषी कायद्याविरूद्ध कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलन यांच्यात होत आहे. शेतकऱ्यांनी कृषी कायदा नीट समजून घ्यायला हवा. शेतकऱ्यांना या कायद्यामुळे अनेक अधिकार मिळणार असून हा कायदा शेतकऱ्यांनी समजून घ्यायला हवा, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. त्याचबरोबर धुळ्यातील शेतकऱ्याचे मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, नवीन शेतीविषयक कायद्यांचा महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शेतकरी जितेंद्र भोईजी यांनी कसा वापर केला, हे आपण समजून त्याची माहिती घेतली पाहिजे. या कायद्याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान केले जाणार आहे. शेतकऱ्यांची थकबाकी देखील येत्या काही दिवसांत दिली जाणार आहे. मोदी पुढे म्हणाले, कृषी कायद्यावर कृषी सुधारणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. पीक खरेदीच्या तीन दिवसानंतरच शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला जातो.