
पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल माहिती घेतली. आमच्या सर्वांचे लक्ष कोरोनाच्या लसीच्या तिसऱ्या ट्रायलवर आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण सर्वात आधी भारतातच होणार असल्याची माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूट येत्या दोन आठवड्यात सरकारकडे परवान्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती देखील पुनावाला यांनी दिली आहे. शनिवारी सीरमचे आदर पुनावाला यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार सीरमची लस : अदर पुनावाला
पूनावाला म्हणाले, आम्ही अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या उत्पादन प्रक्रियेबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली आहे. लसीच्या पूर्ण प्रक्रिया व तयारीबाबत पंतप्रधान समाधानी आहे. आतापर्यंत 4 कोटी डोसची सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती झाली आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकासोबत सीरम इन्स्टीट्यूटने कोरोना प्रतिबंधक लसीसंदर्भात करार केला आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला परवडेल अशीच लसीची किंमत असणार आहे. 30 ते 40 कोटी डोस जुलै 2021 पर्यंत उपलब्ध करणार असल्याचेही पुनावाला यांनी स्पष्ट केले.
एप्रिल महिन्यात कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हिशील्ड या लसीचे डोस बनवणे सुरु केले. सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता.
ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. आता अदर पुनावाला सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी पाहतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल, असे अदर पुनावाला यांनी जाहीर केले आहे. सरकारला ही एक लस अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
