आपल्या जावयाला सासूने लग्नात दिली चक्क खरीखुरी AK-47 दिली भेट!


नवी दिल्ली: अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, पण जो व्हिडिओ यावेळी समोर आला आहे, तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एका विवाह सोहळ्याचा हा व्हिडिओ असून जिथे लग्नसोहळ्या दरम्यान नवरदेवाला भेटवस्तू म्हणून चक्क अत्याधुनिक कलाश्निकोव AK-47 रायफल देण्यात आली आहे. ही रायफल ती देखील एका महिलेने नवरदेवाला भेट दिली आहे. आता सोशल मीडियावर ज्याचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओवर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.


व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याचे सांगितले जात आहे. सासू व्हिडिओमध्ये आपल्या जावयाला भेटवस्तू म्हणून रशियन बनावटीची AK-47 रायफल भेट देत असल्याचे दिसत आहे. महिलेने सुरुवातीला स्टेजवर बसलेल्या नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आणि मग समोर उभे असलेल्या व्यक्तीकडून असॉल्ट रायफल मागून ती नवरदेवाला तिने भेट म्हणून दिली. यावेळी, तेथे उपस्थित लोकांनी जोरदार टाळ्या देखील वाजवल्या.