या संपूर्ण गावाला करोनाचा विळखा

फोटो साभार झी न्यूज

जगभरात करोनाचा हैदोस चालू आहे तसाच तो भारतात सुद्धा आहे. काही शहरात करोनाची दुसरी लाट आली आहे तर हिमाचल राज्याच्या लाहोलस्पिती जिल्यातील एक गाव पूर्णपणे करोना विळख्यात आले आहे. थोरांग असे या गावाचे नाव असून येथील भूषण ठाकूर नावाची एक व्यक्ती सोडून बाकी सर्व ४२ लोकांच्या करोना टेस्ट पोझिटिव्ह आल्या आहेत.

या गावाची लोकसंख्या १०० आहे मात्र प्रचंड हिमवर्षाव झाल्याने अनेक गावकरी कुल्लू येथे गेले आहेत असे समजते. हे सामुदायिक संक्रमण असावे अशी चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे दोन तीन महिन्यापूर्वी या भागात एकाही करोना संक्रमित नव्हता मात्र आता बर्फवृष्टी मुळे तापमान खुपच खाली गेले आहे आणि आता करोना संसर्गाची परिस्थिती हाताबाहेर चालली आहे असे समजते.

थोरंग गावातील भूषण ठाकूर पहिल्यापासून करोना संदर्भातली सर्व नियमावली पाळत आले आहेत. त्याच्या कुटुंबातील पत्नीसह सर्वाना करोना संसर्ग झाला आहे. या भागात पर्यटकांना बंदी केली गेली असून रोहतांग बोगद्याच्या उत्तर भागात हे गाव आहे.