वीज बिलांवरुन महाविकास आघाडी सरकारवर नितेश राणेंची टीका


मुंबई – ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोनाकाळातील वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्दय़ावरुन घूमजाव केले. चुकीचे देयक वीज कंपन्या देणार आणि त्याचे पैसे सरकार भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत राऊत यांची सवलतीची मागणी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने फेटाळल्यामुळे वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, आता विरोधकांकडून यावरू राज्य सरकारवर टीका होत असून सरकारवर भाजपा नेते नितेश राणे यांनी देखील टीका केली आहे.


या महाविकास आघाडी सरकारने ‘NIGHTLIFE’ जास्तच मनावर घेतले आहे असं दिसत आहे. वीजबिल इतके हातात दिले की, कोणीही भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार.. आणि मग.. पेंग्विन गँगची पार्टी सुरु, असल्याचे ट्विट करत नितेश राणे यांनी सरकारला टोला लगावला आहे.