संदीप देशपांडेंनी सांगितला मंत्रालयाचा नवीन पत्ता


मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे गेल्या काही दिवसांपासून विविध संघटनांचे प्रतिनिधी आपल्या मागण्या घेऊन त्यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवर दाखल होत आहे. अनेकांच्या समस्या राज ठाकरेंच्या भेटीनंतर सुटल्या आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. संदीप देशपांडेंनी समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे, कृष्णकुंज, असे ट्विट करत ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.


संदीप देशपांडे यांनी समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता ‘श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28, असे ट्विट केले आहे.

केंद्र तसेच राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारकडून अनलॉक अंतर्गत काही अंशी सूट देण्यात आली होती. त्यानंतर कृष्णकुंजवर जात राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या संघटनांनी यावेळी विविध मागण्या केल्या आहेत. राज ठाकरेंनी या मागण्यांवर थेट संबंधित मंत्र्यांना फोन लावत त्यावर तोडगा काढला होता.