कंगना राणावत फटाकेबंदीच्या विरोधात, ईद-ख्रिसमसवर उपस्थित केले प्रश्न


बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सध्या आपल्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. कंगना राणावतने फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यावरुन आता भाष्य केले आहे. तसेच कंगना राणावतने आपल्या ट्विटद्वारे लिबरल्सवर देखील निशाणा साधला.


बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, चला फटाके न फोडता दिवाळी साजरी करू, ख्रिसमस ट्री न कापता आणि ईदला प्राण्यांवर क्रौर्य न करता … सर्व लिबरल्स माझ्याशी याबाबत सहमत आहेत का? नसल्यास, आपल्याला काय पाहिजे हे पाहणे सोपे आहे. परंतु आपल्याला जे पाहिजे आहे ते का हे स्पष्ट नाही. स्वत: ला विचारा की या काळ्या इच्छांच्या मागे काय कारण आहे.

दरम्यान कंगना राणावतच्या या ट्विटला एका वापरकर्त्याने उत्तर लिहिले की, फटाक्यांविना दिवाळी साजरी केली जात आहे, जेणेकरून पर्यावरणाचे रक्षण होईल, तर ख्रिसमस देखील झाडे न कापता साजरा करावा. जेणेकरून हा ग्रह वाचू शकेल. प्रत्येक उदारमतवादीने ही ट्विट पाहिली आहेत आणि आपली भूमिका घेतली आहे याची खात्री करा.