सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा शेरेबाजीतच रस: फडणवीस


मुंबई-शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यापेक्षा किरकोळ विषयांवर शेरेबाजी करण्यातच महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नेत्यांना अधिक रस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार कमालीचे उदासीन आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

कापूस खरेदीबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत मागणी असूनही कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे तर दूरच राहिले, अद्याप नुकसानीचे पंचनामेही झालेले नाहीत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सत्ताधारी उदासीन आहेत. मात्र, जे विषय अस्तित्वातच नाहीत, अशा किरकोळ विषय आणि मुद्द्यांवर अकारण टीकाटिप्पणी आणि शेरेबाजी करण्यातचा त्यांना अधिक रस आहे, असे सांगत सरकार निष्क्रीय असल्याचे त्यांनी नमूद केले.