‘मित्रा’ला टाळू नका

vitamin
आपल्या संस्कृतीमध्ये सूर्याची बारा नावे सांगितली आहेत. त्यातले पहिलेच नाव आहे मित्र. त्यानंतरची नावे रवी, भास्कर, अर्क, भानू वगैरे वगैरे आहेत. जी नावे बारा सूर्यनमस्कार घालताना उच्चारली जातात. त्यातलले मित्र हे नाव सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण सूर्य आपला खरोखरच मित्र आहे. परंतु हा मित्र अधिक आग ओकायला लागला की आपल्याला त्रास वाटायला लागतो आणि आपण नाना प्रकारच्या युक्त्या करून स्वतःची सूर्याच्या प्रखर किरणांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र असे करताना आपण शरीराला ड जीवनसत्त्व पुरवणार्‍या स्रोतापासून दूर ठेवत असतो. म्हणून शास्त्रज्ञ आज लोकांना सूर्यप्रकाशात फिरण्याचा सल्ला देत आहेत. सूर्य आपल्याकडून एकही पैसा न घेता जीवनसत्त्व बहाल करत असतो.

आपल्या देशात तर भरपूर ऊन पडते. मात्र सूर्याचे असे वरदान लाभलेल्या या देशामध्येच ड जीवनसत्त्वाची कमतरता सुध्दा जाणवत आहे. ही एक विसंगती आहे. कारण आपण सूर्यप्रकाशाच्या प्रदेशात राहूनही सूर्यापासून आपण सुटका करून घेतो. शरीराला जीवनसत्त्व कमी पडले की हाडे ठिसूळ होतात. पन्नाशी गाठण्याच्या आतच गुडघे दुखायला लागतात. हे सारे आजार टाळायचे असतील तर दररोज किमान २० मिनिटे तरी उन्हात फिरले पाहिजे. त्यासाठी फार प्रखर उन्हामध्ये दुपारी फिरण्याचीही गरज नाही आणि चेहरा काळा करून घेण्याचीही गरज नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा मावळतीच्या उन्हातसुध्दा आपण फिरू शकतो. ज्या फिरण्यातून आपल्याला ड जीवनसत्त्व मिळते. ज्यांची कातडी गोरी आहे त्यांनी २० मिनिटे आणि ज्यांची कातडी काळी आहे त्यांनी ३० ते ४० मिनिटे दर आठवड्याला उन्हामध्ये फिरले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment