टायगर श्रॉफच्या आगामी ‘गणपथ’चा टीझर रिलीज


काही दिवसांपूर्वीच टायगर श्रॉफच्या आगामी ‘गणपथ’ या चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज करण्यात आले होते. पोस्टर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे. त्यातच या चित्रपटाचे टीझर पोस्टर आता समोर येत आहे. टायगर श्रॉफ या पोस्टरमध्ये पुन्हा एकदा दमदार अंदाजात पाहायला मिळत आहे. टायगर श्रॉफचा स्वॅग यात पाहण्यासारखा आहे. विशेष म्हणजे यात टायगरच्या तोंडी आपुन डरता है ना तो आपुन बहुत मारता है, असा एक डायलॉग देखील ऐकायला मिळत आहे.


निर्मात्यांनी सोशल मीडियावर टायगर श्रॉफचे गणपथ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्यांनी हे शेअर करताना पोस्टमध्ये लिहिले की, गणपथ जेव्हा येतो तेव्हा धम्माल उडवून देतो. पहा गणपथचा शानदार लूक. टायगर श्रॉफ याच्या दुसऱ्या चित्रपटांपेक्षा अगदी वेगळा असा हा चित्रपट आहे. त्यामुळेच या चित्रपटाचा पहिला भाग असल्याने टायगर श्रॉफ अत्यंत आनंदी आहे. टायगर या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जॅकी आणि विकास बहल सोबत काम करणार आहे. दरम्यान, या टीमसोबत काम करताना आनंद होत असल्याचे टायगरने सांगितले आहे.