गुगल सर्चवर तेजस्वी यादव यांनी मारली बाजी

फोटो साभार रिपब्लिक वर्ल्ड

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे आणि सायंकाळ पर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या वेळी बिहार सिंहासनावर तेजस्वी बसणार की नितीश याची चर्चा होत असली तरी सध्या तरी तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर गुगल सर्च मध्ये तरी बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नऊ नोव्हेंबर रात्रीपासूनच तेजस्वीने गुगल सर्च वर नितीशना मागे टाकले आहे. पहाटे दोनच्या सुमारास नितीश यांचा सर्च व्हॉल्युम ९ होता तर तेजस्वी यांचा सर्च व्हॉल्युम ४३ वर होता. त्यात सतत वाढ होताना दिसत आहे. तेजस्वीने २१ दिवसात २५१ प्रचार सभा घेतल्या होत्या. म्हणजे दिवसाला १२ सभा त्यांनी घेतल्या होत्या. एक्झिट पोल मधून महागठ्बंधन आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असे अंदाज व्यक्त केले गेले आहेत.

गुगल ट्रेंड मध्ये मेघालय राज्यात नितीश तेजस्वी यांचा सर्च व्हॉल्युम ५०-५० आहे मात्र मतमोजणी सुरु झाल्यापासून तेजस्वीचा सर्च वाढतो आहे. बिहार मध्ये नितीश की वर्ड सर्च ४६ टक्के तर तेजस्वी ५४, हिमाचल मध्ये तेजस्वी ६२, पंजाब मध्ये तेजस्वी ७० नितीश ३० असे ट्रेंड दिसत आहेत. गेल्या काही तासात तेजस्वी सर्च १४० टक्क्यांनी वाढला असल्याचे सांगितले जात आहे.