नाशिकमध्ये फटाके बंदी; फटाके फोडल्यास होणार कारवाई


नाशिक – फटाके फोडण्यावर नाशिक जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. हा बंदी आदेश येत्या 10 नोव्हेंबरच्या रात्रीपासून लागू होणार आहे. त्याचबरोबर कंटेनमेंट झोन परिसरात फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचे राज्यावर ओढावलेले संकट पाहता हे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे दिले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसांपूर्वीच राज्यात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे जनतेला आवाहन केले होते. कुणालाही फटाक्यांमुळे श्वसनाचा त्रास उद्भवणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असल्याचे टोपे यांनी सांगितले होते.