आला हिवाळा, नियम पाळा

winter
हिवाळा सुरू झाला आणि थंडीची चाहूल लागली की आरोग्याच्या काही ठराविक तक्रारी सुरू होतात. काही लोकांना थंडी बाधते आणि त्यांना सर्दी होते. मात्र हिवाळ्यात होणारी ही सर्दी आणि हिवाळ्यात होणार्‍या प्रदूषणामुळे होणारा ऍलर्जीचा त्रास यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. ते ध्यानात घेण्याची गरज आहे. एरवी ऍलजीमुळे सर्दी होणार्‍या लोकांना ती हिवाळ्यात जास्त होण्याची शक्यता असते. सर्दीमध्ये नाक वाहते आणि सतत त्रास होत राहतो. परंतु सर्दीचा त्रास काही दिवसात बरा होतो. तो जास्तीत जास्त दहा दिवस राहतो. ऍलर्जीचा त्रास काही आठवडे किंवा कधी कधी दोन तीन महिनेही जारी राहतो.

ऍलर्जीचा त्रास फार दिवस होण्याचे कारण म्हणजे तो त्रास केवळ थंडीमुळे झालेला नसतो तर तो हवेतल्या प्रदूषणामुळे झालेला असतो. अशा लोकांनी इन्हेलर जरूर वापरला पाहिजे. त्याशिवाय डॉक्टरांनी शिफारस केलेले स्प्रे आवर्जुन वापरले पाहिजेत. अशा प्रकारच्या ऍलर्जीचा त्रास होऊच नये यासाठी घर धुळीपासून मुक्त ठेवले पाहिजे. घरातले कारपेटस् आणि गादीवरील चादरी आठवड्यातून एकदा तरी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ केल्या पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे अशा लोकांनी धूम्रपान टाळले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment