उपयोगी पडणार्‍या वाईट सवयी

eating
खाण्यापिण्याच्या सवयींच्या बाबतीत बरीच चर्चा केली जाते आणि काही खाद्यपदार्थ काही सवयी वाईट असल्याचे आवर्जुन सांगितले जाते. काय खावे, काय खाऊ नये याचे बरेच मोठे नियम आहेत. पण ते सगळे नियम पाळणे शक्य आहे का याचा विचार केल्यास असे लक्षात येते की खाण्यापिण्याची सगळी पथ्ये पाळणे मोठे अवघड आहे. ते सगळे नियम पाळत असल्यास जगणे मुश्किल होऊन जाईल असेही काही लोकांचे म्हणणे असते. तेव्हा आहारतज्ञांना असे वाटते की खरोखरच एवढी पथ्ये पाळणे खरेच गरजचे आहे का? उलट काही आहारतज्ञांनी वेगळाच शोध लावला आहे. खाण्यापिण्याच्या काही वाईट समजल्या जाणार्‍या सवयींचे फायदेही होतात असा त्यांचा दावा आहे.

कॉफी पिणे वाईट. कॉफीचे जास्त सेवन केल्यास पित्त वाढते. हे तर सर्वश्रुत आहे. मात्र डॉक्टरांनी असे दाखवून द्यायला सुरूवात केली आहे की जे लोक दिवसाला एक कपापेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना टाईप टू डायबेटिस होण्याची शक्यता कमी असते. व्हाईट ब्रेडच्या बाबतीत असेच म्हटले जाते. कारण त्याच्यामुळे जाडी वाढते. त्याचे पोषणमूल्य कमी असते. मात्र आता शास्त्रज्ञ असे म्हणताहेत की व्हाईट ब्रेडमुळे शरीरातील लोह आणि फायबरचे प्रमाण वाढते.

गोठवलेल्या फळभाज्या शरीराला वाईटच मात्र त्यांच्यामुळे लोकांची सोय होते. म्हणून लोक त्या खातात. पण आता शास्त्रज्ञ असे म्हणताहेत की भाज्या गोठवल्याने त्यातील पोषणद्रव्यांचा र्‍हास कमी झालेला असतो. म्हणजे त्याच भाज्या अधिक पोषक असतात. चॉकलेट खाणे वाईट हे तर काही सांगायला नकोच. लहान मुले खूप चॉकलेट खातात आणि खाता खाता चॉकलेटचे वाईट गुणधर्मही ऐकत असतात. परंतु आता आहारतज्ञ असे सांगायला लागले आहेत की चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत त्यामुळे ते चरबी वाढवण्यास तसेच रक्तदाब वाढण्यास प्रतिबंध करू शकते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment