झाडूशी निगडीत या मान्यता तुम्हाला माहिती आहेत का?

Broom
हिंदू धर्मामध्ये झाडू किंवा केरसुणीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. म्हणूनच दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या वेळी झाडूची पूजा करण्याची प्रथा अनेक ठिकाणी रूढ आहे. झाडू दरिद्रता रूपी कचरा दूर करीत असून, घराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता ठेऊन घरामध्ये सकारात्मक उर्जा संचारित करणारा असा हा झाडू मानला गेला आहे. घरातील वास्तूदोष नाहीसे करण्यासाठी देखील झाडूचे महत्व वास्तूशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. त्यामुळे झाडू घरामध्ये कसा ठेवला जावा याबाबतीत अनेक मान्यता रूढ असून, या मान्यतांचे पालन केल्याने घरामध्ये महालक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा रूढ आहे.
Broom2
प्राचीन काळापासून चालत आलेल्या परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीची कृपा असावी या करिता घराच्या जवळील मंदिरामध्ये तीन झाडू दान देण्याची पद्धत आहे. हे दान देताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मंदिरामध्ये झाडू दान देताना ते ब्राह्ममुहूर्तावर दान दिले जावेत. तसेच हे दान देण्यासाठी चांगला दिवस निश्चित करावा. सणावारी केलेले हे दान विशेष फल देणारे मानले जाते. हे दान कोणालाही न सांगता, गुप्त पद्धतीने केले जावे. दान ज्या दिवशी करायचे असेल, त्याच्या एक दिवस आधीच बाजारातून झाडू आणून घरामध्ये ठेवले जावेत, व दुसऱ्या दिवशी हे दान केले जावे.
Broom1
झाडूमुळे घरातील नकारात्मक उर्जा नष्ट होते असे मानले जाते. याच कारणास्तव काही मान्यता रूढ आहेत. झाडू एखाद्या खुल्या ठिकाणी न ठेवता दरवाजाच्या मागे ठेवला जावा. तसेच नव्या घरामध्ये प्रवेश करताना नेहमी नवा झाडू घरामध्ये खरेदी केला जावा. हा शुभशकुन समजला जातो.

Leave a Comment