धनतेरसच्या दिवशी या वस्तू खरेदी करणे टाळा

आपल्याकडे दिवाळीला एक विशेष महत्त्व आहे. दिवाळीच्या महापर्वाची सुरूवात ही धनतेरसपासून होत असते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. धनतेरसच्या दिवशी अनेकजण घरासाठी सामान खरेदी करतात. या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जाते. तर मान्यतेनुसार, या दिवशी काही गोष्टी अजिबात खरेदी करू नयेत.

धनतेरस तिथी आणि शुभमुहूर्त –

धनतेरस तिथी – 25 ऑक्टोंबर 2019

त्रयोदशी तिथी प्रारंभ: 25 ऑक्टोंबर 2019 ला सायंकाळी 07 वाजून 08 मिनिट ते

त्रयोदशी तिथी समाप्‍त: 26 ऑक्टोंबर 2019 दुपारी 03 वाजून 36 मिनिट

धनतेरस पूजेचा मुहूर्त: 25 ऑक्टोंबर 2019 ला सायंकाळी 07 वाजून 08 मिनिट ते रात्री 08 वाजून 13 मिनिटांपर्यंत

कालावधी: 01 तास 05 मिनिट

धनतेरसच्या दिवशी काय खरेदी करावे ?

 • या दिवशी सोने-चादींचे दागिने खरेदी करणे शुभ समजले जाते. याशिवाय तुम्ही सोने अथवा चांदीची नाणी देखील खरेदी करू शकता.
 • चांदी आणि पितळेची भांडी खरेदी करणे चांगले समजले जाते.
 • मान्यता आहे की, भगवान धन्वतंरी समुद्र मंथनावेळी हातात कलश घेऊन जन्माला आले होते. त्यामुळे पाणी भरण्याचे भांडे खरेदी करावे.
 • लाह्या-बताशे, दिवे खरेदी करा.
 • तुम्ही या शुभमुहूर्तावर वाहन देखील करू शकता.
 • या दिवशी गणपती-लक्ष्मीच्या वेगवेगळ्या मुर्ती खरेदी कराव्यात. दिवाळीच्या दिवशी या मुर्तींची पूजा करावी.
 • या दिवशी घरातील वस्तू जसे की, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर ग्राइंडर, डिनर सेट फर्निचर इत्यादी गोष्टी देखील खरेदी करू शकता.
 • धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा. मान्यता आहे की, झाडू गरिबी दूर करते.

धनतेरसच्या दिवशी या गोष्टी खरेदी करणे टाळा –

 • मान्यतेनुसार, धनतेरसच्या दिवशी काचेचे सामान खरेदी करू नये.
 • हिंदू धर्मात काळा रंग शुभ समजला जात नाही. त्यामुळे काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नका.
 • या दिवशी टोकदार वस्तू जसे की, कैची आणि चाकू खरेदी करू नये. तसेच, या दिवशी उधार देऊ नका आणि घेऊ देखील नका.

Leave a Comment