अर्णब गोस्वामी अटकेवरुन चवताळलेल्या निलेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल


मुंबई – राज्यातील भाजप नेत्यांकडून रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईनंतर राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अर्णब गोस्वामी यांना वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर राज्यात आणीबाणीची आठवण करुन देणारी परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. दरम्यान एका जुन्या घटनेची आठवण करुन देत स्वतःला अटक करणार का? अशी विचारणा भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.


उस्मानाबादमधील दिलीप ढवळे आत्महत्येसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट निलेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत. कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत. दाखवून द्या न्याय सगळ्यांसाठी एक असतो, असे निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.