पाम्पोर मध्ये दरवळतोय केशराचा सुगंध

फोटो साभार द प्रिंट

काश्मीर खोऱ्यात केशराचे मळे फुलले असून फुले वेचणीचे काम जोरात सुरु झाले आहे. हा सारा परिसर केशराच्या सुगंधाने दरवळू लागला आहे. काश्मीर खोऱ्यात हजारो एकर जमिनीवर केशर लागवड होते आणि आता हा परिसर निळ्या जांभळ्या फुलांनी बहरून गेला आहे. २७ ऑक्टोबर हा केशर दिवस म्हणून साजरा होतो आणि त्या दिवसापासून फुले तोडणीला सुरवात केली जाते.

राष्ट्रीय केशर मिशन संबंधित कृषी वैज्ञानिक सांगतात, केशर हे जगातील सर्वात महाग पिक आहे. त्याचा भाव किलोला दीड ते तीन लाख इतका आहे. भारतात द. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर शहर केशर शहर म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीनगर पासून २० किमीवर जम्मू श्रीनगर् हायवेवर हा भाग आहे. सप्टेंबर मध्ये केशराचे कंद जमिनीत लावले जातात आणि ऑक्टोबर मध्ये त्याला फुले येतात. या फुलातील पराग म्हणजे केशर असते. किश्तवाड जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर केशर पिकविले जाते.

यावर्षी ३७१५ हेक्टर क्षेत्रात केशराची लागवड झाली असून यंदा ५ टन उत्पादन अपेक्षित आहे.