महाराष्ट्र सरकारवर प्रकाश जावडेकर यांची टीका


नवी दिल्ली – वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करताना पत्रकारितेवर जो हल्ला मुंबईत झाला, तो निंदनीय असून आणीबाणीसारखी महाराष्ट्र सरकारची कारवाई आहे. या कारवाईचा आम्ही निषेध नोंदवतो, असे म्हटले आहे.

अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर ट्विट करुन प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी अर्णव गोस्वामीवर केलेली कारवाई प्रेस-पत्रकारितेवर हल्ला असल्याची टीका केली. अर्णव गोस्वामी यांच्यावरीलर कारवाई आणीबाणीसारखी असल्याची टीका देखील जावडेकर यांनी साधला. महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईची निंदा करतो, असे प्रकाश जावडेकर म्हणाले आहेत.