अर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरले नितेश राणे, डागले ठाकरे सरकारवर टीकास्त्र


मुंबई : वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आल्यानंतर ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. गोस्वामींना बेड्या ठोकल्यानंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे. त्यातच ‘हिसाब तो होगा, इंटरेस्ट लगाके’ असे ट्विट करत ठाकरे सरकारवर भाजप आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.


‘सत्ता आज है, कल नही… आज तुम्हारी है… कल हमारी होगी.. बस इतना याद रखना… हिसाब तो होगा.. इंटरेस्ट लगा के’ असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणेंनी या ट्विटमध्ये कोणालाही मेन्शन केलेले नाही किंवा कोणाचे नावही घेतलेले नाही. पण अर्णव गोस्वामींच्या अटकेनंतर अवघ्या काही मिनिटांत हे ट्विट केल्याने त्याच्याशी संबंध जोडला जात आहे.

Loading RSS Feed