‘बुर्ज खलिफा’ या गाण्यानंतर ‘लक्ष्मी’मधील नवे गाणे तुमच्या भेटीला


‘गुड न्यूज’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी ही जोडी पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘लक्ष्मी’ या चित्रपटात अक्षय एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे.दरम्यान चित्रपटातील ‘बुर्ज खलिफा’ हे गाणे रिलीज केल्यानंतर चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटातील या गाण्यात अक्षय कुमारचा अवतार बघण्यासारखा आहे.

अक्षय कुमार ‘लक्ष्मी’च्या नुकत्याच रिलीज केलेल्या गाण्यात तृतीयपंथीयाच्या रुपात डान्स करताना दिसत आहे आणि देवाची प्रार्थना करत आहे. ९ नोव्हेंबरला हा बहुचर्चित चित्रपट रिलीज होणार आहे. हा चित्रपट घोषणेपासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत होता. या चित्रपटाच्या शीर्षकावर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाचे शीर्षक बदलून फक्त ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले.